राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या राजीनामास्त्र, चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे (After the decision of resignation of NCP President Sharad Pawar, resignation of office bearers across the state, resignation of office bearers of NCP in Chandrapur district.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेनंतर पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी पद सोडल्यापासून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षातही राजीनामा देणे सुरू झाले आहे. पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह कार्यकारिणीने पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमाणी यांनी राजीनामा दिला आहे. मंगळवारी मुंबईत आपल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे पवारांच्या समर्थनार्थ पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. त्याच अनुषंगाने चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीनेही राजीनाम्याची घोषणा करत हायकमांडकडे राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष बेबी उईके, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यादरम्यान वैद्य यांनी आपले निवेदन जारी केले की, "आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करू. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार नसतील तर आम्हीही आमच्या पदावर राहणार नाही. आम्ही सर्व पवार यांच्या सोबत आहोत. नुकतीच शरद पवार यांनी भाकरी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. पवार साहेबांना जिल्ह्यात काही बदल करायचे असतील तर तेदेखील करू शकतात, असेही वैद्य म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)