चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती कार्यक्रमाचे आयोजन (Organized Buddha Jayanti program at historical Diksha Bhoomi of Chandrapur)
चंद्रपूर :- त्रिविध पावन बौद्ध पौर्णिमा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर तथा डॉ.आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 मे 2023 ला सकाळी 09:00 वाजता चंद्रपूर दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय अरुण घोटेकर राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अशोक घोटेकर व संस्थेचे सचिव माननीय वामनराव मोडक व डॉ. स्निग्धा सदाफळे उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून प्रा. रवी कांबळे चंद्रपूर हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रा. रवी कांबळे लिखित 'संपूर्ण बौद्ध सण' या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तरी चंद्रपूर शहरातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर संस्थेकडून खीरदान करण्यात येणार असल्याची माहीती आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या