राजकीय भूकंप ! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय (Political earthquake! NCP National President Sharad Pawar's decision to retire)

Vidyanshnewslive
By -
0

राजकीय भूकंप ! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय (Political earthquake!  NCP National President Sharad Pawar's decision to retire)

मुंबई :- गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता या पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद पवार साहेबांनी सोडू नये, असा आग्रह धरत घोषणाबाजी केली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केले. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. शरद पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. शरद पवारांच्या या निर्णयाने पक्षाच्या कार्यकर्त्यात चिंतेचे वातावरण पसरले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी आंदोलन सुरु केले असून मात्र या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वेगळा सूर होता वाढत्या वयामूळ आता पवार साहेबाची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळं शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं समर्थन केलंय मात्र एकूणच परिस्थिती पाहता कोर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपला निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यानी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)