" वाघ पहायचे असेल तर ताडोबात जा " फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सलमान खान व आयुष खुराणा यांचं सिनेसृष्टीतील कलावंताना ताडोबा सफारीचे निमंत्रण (Actors Salman Khan and Ayush Khurrana invited to Tadoba Safari at Filmfare Awards)

Vidyanshnewslive
By -
0

" वाघ पहायचे असेल तर ताडोबात जा " फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता   सलमान खान व आयुष खुराणा यांचं सिनेसृष्टीतील कलावंताना ताडोबा सफारीचे  निमंत्रण (Actors Salman Khan and Ayush Khurrana invited to Tadoba Safari at Filmfare Awards)

मुंबई :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक दोन नाही तर ११५ टायगर अर्थात पट्टेदार वाघ आहेत, ३०० पेक्षा अधिक बिबट, हरण, चितळ, नीलगाय, अस्वल तथा विविध वन्यप्राणी आहेत. तर चला ताडोबा सफारी करा, असे आवाहन सिनेसृष्टीतील टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खान तथा अभिनेता आयुष्यमान खुराणा यांनी सिनेसृष्टीतील सर्व कलावंतांना केले. यावेळी अभिनेता आयुष्यमान खुराणा हा या कार्यक्रमात सलमान खान यांच्या रुपात टायगर सहभागी झाल्याचे सांगत आहे. तर सलमान खान कार्यक्रमात तर एक नाही दोन टायगर आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल ११५ वाघ आहेत. या पट्टेदार वाघांना बघण्यासाठी एकदा ताडोबाची सफारी करा, असे आवाहन सर्व कलावंतांना सलमान यांनी केले. यावर अभिनेता आयुष्यमान खुराणा यांनी ताडोबा प्रकल्प हा ६२५ चौरस किलोमीटरमध्ये विस्तीर्ण आहे. या प्रकल्पात ११५ वाघच नाही, तर ३०० पेक्षा अधिक बिबट्या, चितळ, हरण, अस्वल, नीलगाय, कोल्हा तथा विविध वन्यप्राणी व सुंदर जंगल आहे. तेव्हा या प्रकल्पाला नक्की भेट द्या, असे आवाहन केले. विशेष म्हणजे राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अभिनेता सलमान खान यांची मैत्री आहे. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या सोबतच्या याच मैत्रीतून अभिनेता सलमान खान याने सर्व कलावंतांना ताडोबा सफरीचे निमंत्रण दिले आहे. ताडोबा प्रकल्प हा देशातच नाही तर विदेशातदेखील प्रसिद्ध आहे. येथे चित्रपट सृष्टीतील जुन्या व नवीन पिढीच्या असंख्य कलावंतांनी हजेरी लावली आहे. आजही अनेक कलावंत या प्रकल्पात वाघांच्या भेटीसाठी येतात. क्रिकेटर, उद्योगपती, राजकारणी, समाजकारणी, विविध मान्यवर मंडळीही भेट देतात. सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन तर वन विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर राहिलेले आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)