बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपशी युती भोवली, प्रकाश देवतळे यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबागडी, तात्पुरता प्रभार शहर जिल्हाध्यक्षाकडे - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश (Alliance with BJP in market committee elections, removal of Prakash Deotale from the post of Congress district president, temporary charge to city district president - order of state president Nana Patole)

Vidyanshnewslive
By -
0

बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपशी युती भोवली, प्रकाश देवतळे यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबागडी, तात्पुरता प्रभार शहर जिल्हाध्यक्षाकडे - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश (Alliance with BJP in market committee elections, removal of Prakash Deotale from the post of Congress district president, temporary charge to city district president - order of state president Nana Patole)

चंद्रपूर :- एकीकडे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय फटाके फुटत असुन काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे ह्यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले ह्यांनी हकालपट्टी केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळले असुन बाजार समिती निवडणुकीत देवतळे ह्यांनी भाजपसोबत केलेली युती व त्यानंतरचा जल्लोष त्यांना भोवला असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट झाले आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर पुढील नियुक्ती होत पर्यंत ह्या पदाचा कार्यभार काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांचेकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत असल्याचेही आदेशात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी 3 मे 2023 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आदानी समुहातील महाघोटाळ्यासंदर्भात पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी उठविलेला आवाज भाजपाने हुकुमशाही पध्दतीने दडपण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भाजपा विरोधात थेट संघर्ष करत असताना भाजपाशी कोणत्याही पध्दतीची हात मिळवणी करणे असुनही स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणूकीमध्ये भाजप किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये अशा स्पष्ट सुचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येऊनही नुकत्याच संपन्न झालेल्या चंद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रकाश देवतळे ह्यांनी उघड उघड भाजपसोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे. प्रकाश देवतळे ह्यांचे हे कृत्य पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे त्यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)