सत्य, अहिंसा, शांती व करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुध्द ! Tathagata Lord Buddha who gives the message of truth, non-violence, peace and compassion !

Vidyanshnewslive
By -
0

सत्य, अहिंसा, शांती व करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुध्द ! Tathagata Lord Buddha who gives the message of truth, non-violence, peace and compassion !



वृत्तसेवा :- महाकारुणिक तथागत भगवान बुध्द यांना " लाईट ऑफ एशिया " म्हणुन ही ओळखलं जात, तसेच आजही भारताला जगात बुध्दाचा देश म्हणुन ओळखलं जातंय जगातील अनेक देशातून लाखो पर्यटक बुध्दाच्या पद्स्पर्शान पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होण्यासाठी भारतात दाखल होतात. अशा या सत्य, अहिंसा व शांतीचा संदेश देणाऱ्या महामानवांची आज जयंती आहे. मे महिन्यातील येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. बुद्ध पौर्णिमा विशेषत: आशिया, तिबेट, आग्नेय आशिया, थायलंड, चीन, कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा ही तीन कारणांसाठी (Reasons) खास आहे. या दिवशी पहिला राजकुमार सिद्धार्थचा जन्म झाला. त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी येथे झाला होता. दुसरा, हा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. बुद्ध (Buddha) हा एक महान धर्मोपदेशक होता ज्याने बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत आणि आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगली प्रवचने ऐकलीत तरी जीवनात (Life) अवलंब केल्याशिवाय त्यांचा काहीही उपयोग होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)