नवी दिल्लीतील नव्या संसद भवन, " सेंट्रल व्हिस्टा " च्या उदघाटन प्रसंगी मोदींच्या हस्ते 75 रुपयांचं विशेष नाणे प्रसिध्द होणार ! (A special Rs 75 coin will be released by Modi at the inauguration of the new Parliament building, "Central Vista" in New Delhi.)

Vidyanshnewslive
By -
0

नवी दिल्लीतील नव्या संसद भवन, " सेंट्रल व्हिस्टा " च्या उदघाटन प्रसंगी मोदींच्या हस्ते 75 रुपयांचं विशेष नाणे  प्रसिध्द होणार ! (A special Rs 75 coin will be released by Modi at the inauguration of the new Parliament building, "Central Vista" in New Delhi.)

दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान ७५ रुपयांचे नाणे बाजारात आणले जाणार आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे विशेष नाणे लॉन्च केले जाणार असल्याची वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ७५ रुपयांच्या या नाण्याच्या डिझाईनपासून ते त्याचा आकार आणि छपाईपर्यंत अनेक वैशिष्ट्ये असतील. नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आहे. अशा स्थितीत या नाण्याचे स्वरूपही नव्या संसद भवनासारखे असण्याची शक्यता आहे. संसद भवनाच्या लॉन्चिंगवेळी जारी करण्यात येणारे ७५ रुपयांचे नाणे ३५ ग्रॅमचे असेल. त्यात ५० टक्के चांदी आणि ४० टक्के तांबे असेल. याव्यतिरिक्त ५ टक्के झिंक आणि निकेल असेल. दुसरीकडे जर आपल्याला त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंह असेल, ज्याच्या खाली “सत्यमेव जयते” लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरी लिपीत 'भारत' आणि उजवीकडे इंग्रजीत 'इंडिया' लिहिलेलं पाहायला मिळेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे डिझाईन बनवले जाईल आणि त्याच्या वर आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले दिसेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)