चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वडिलांचे वयाच्या 80 व्या वर्षी नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू Chandrapur Lok Sabha Constituency MP Balubhau Dhanorkar's father dies at the age of 80 during treatment in Nagpur

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील व वरोरा मतदार संघाच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांचे सासरे श्री. नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी 27 मे रोजी सायंकाळी 5.30 नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. आज भद्रावती येथील घुटकाळा वार्डातील निवासस्थानी सायंकाळी ८ ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज रविवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 9 वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. असून यावेळी राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)