बल्लारपूर किन्ही नाल्याजवळ लग्नाच्या वरातीची ट्रॅव्हल्स पलटली, 1 मृत्यू तर 6 गंभीर व 24 किरकोळ जखमी असल्याचं वृत्त (Ballarpur Travels of wedding party overturned near Kinhi Nala, 1 dead, 6 seriously injured and 24 minor injuries reported)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर किन्ही नाल्याजवळ लग्नाच्या वरातीची ट्रॅव्हल्स पलटली, 1 मृत्यू तर 6 गंभीर व 24 किरकोळ जखमी असल्याचं वृत्त (Ballarpur Travels of wedding party overturned near Kinhi Nala, 1 dead, 6 seriously injured and 24 minor injuries reported)

बल्लारपूर :- राजुरा येथून लग्नाची वरात घेऊन परत येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स चक्क नाल्यात पलटली, या भिषण अपघातात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 24 जण जखमी असल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावाजवळील नाल्याजवळ घडली. राजूरा येथून लग्न विधी आटोपून वरात 12 मे रोजी रात्रो 10:30 वाजताच्या दरम्यान नांदगाव (घोसरी) या गावाकडे परत जाताना ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण किन्ही गावाजवळील नाल्याजवळ सुटल्याने ट्रॅव्हल्स चक्क नाल्यात पलटली. यावेळी ट्रॅव्हल्स मध्ये 60 प्रवासी बसले असल्याने एकच गोंधळ माजला, अपघातग्रस्तांच्या कल्लोळाने गावकरी घटनास्थळी धावले आणि प्रवाश्यांना काढत पोलिसांना घटनेची माहिती दिली. या भिषण अपघातात सुनंदा हरिदास मडावी वय 50 यांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी असून 24 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बल्लारपूर पोलीस घटनास्थळी पोहचून तात्काळ आवश्यक सेवा पुरवण्यासाठी पुढाकार घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविण्यात आले, पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)