अबब ! असाही एक कासव त्याला खायला हवे फक्त चिकन, फळे दिली तर नाक मुरडतो. (Abba ! Even such a turtle wants to eat only chicken, and if given fruit, it turns its nose.)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! असाही एक कासव त्याला खायला हवे फक्त चिकन, फळे दिली तर नाक मुरडतो. (Abba ! Even such a turtle wants to eat only chicken, and if given fruit, it turns its nose.)

वृत्तसेवा :- त्या' कासवाला सावजी चिकनच हवे.. त्याच्यापुढे फळे टाकली तर तो नाक मुरडतो.. पण चिकन आणि मासे टाकले तर यथेच्छ ताव मारत असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली. नाईक तलाव येथे सफाई मोहिमेदरम्यान काही दिवसांपूर्वी सापडलेला कासव आता सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात मुक्कामी आहे. या केंद्राकडूनही त्याची चांगली बडदास्त ठेवण्यात येत आहे. ७० ते ८० वर्षे वयाचे हे कासव आहे. नाईक तलावात सफाई मोहिमेदरम्यान ते सापडले. परिसरातील लोकांनी त्यावेळी हे कासव वनखात्याच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात ठेवण्यास नकार दिला. तो आमच्या देवाचा कासव आहे, असे त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे होते. तलावाची स्वच्छता झाल्यानंतर ते परत तेथेच सोडण्यात येईल, या अटीवर ते केंद्रात आणले. मात्र, येथे त्याने चिकन आणि मास्यांवर ताव मारायला सुरुवात केली आहे. फळे आणि भाज्या खायला दिल्या तर तो क्वचितच खातो. दररोज त्याला अर्धा किलो चिकन द्यावे लागते. कासवांना विविध प्रकारचे वनस्पती-आधारित खाद्यपदार्थ आवडतात. पाळीव कासवाच्या दैनंदिन आहारातील सुमारे ८० टक्के ताज्या भाज्या आणि केळी, पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड, मोहरी आणि कोलार्ड हिरव्या भाज्या असतात. काही हिरवे किंवा पिवळे सिमला मिरची, रताळे, स्क्वॅश किंवा फ्लॉवरदेखील खाल्ले जातात. मात्र, नाईक तलावातील कासवाने वेगळाच इतिहास निर्माण केला आहे. नाईक तलाव हे ब्रिटिशकालीन आहे आणि हा कासवही तेव्हापासूनच या तलावात आहे. आता या तलावाला सावजी खाणावळीचा विळखा बसला आहे आणि खाणावळींमधला कचरा या परिसरातच टाकला जात असल्याने तेथूनच त्याला चिकनची सवय लागली असावी, अशी शंका केंद्राच्या चमूला आहे. या तलाव परिसरातील वाढती घाण पाहूनच त्याची स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेदरम्यान हे कासव तेथे आढळले. या केंद्रात आणल्यानंतर त्याला सुरुवातीला फळे आणि भाजी देण्याचा प्रयत्न झाला, पण कासवाला ते आवडत नाही. म्हणूनच त्याला दररोज अर्धा किलो चिकन दिले जाते, त्यानंतरच त्याला जेवण मिळते. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमूदेखील त्याचे हे लाड आवडीने पूरवत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)