स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास होतो - डॉ. बी. डी. चव्हाण, प्रभारी प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपुर (The latent qualities of the student are developed through Sneh Samela - Dr. B. D. Chavan, In-charge Principal, Mahatma Jyotiba Phule College Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास होतो  - डॉ. बी. डी. चव्हाण, प्रभारी प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपुर  (The latent qualities of the student are developed through Sneh Samela - Dr.  B.  D.  Chavan, In-charge Principal, Mahatma Jyotiba Phule College Ballarpur)


बल्लारपूर - बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज 20 एप्रिल 2023 रोजी एकदिवसीय सांस्कृतिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होत दरवर्षी डिसेम्बर-जानेवारी मध्ये होणार स्नेह संमेलन तांत्रिक कामामुळं पुढे ढकलण्यात आलं होत मात्र आज ते संपन्न होत आहे या स्नेह संमेलनाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली यावेळी मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.बादलशाह चव्हाण म्हणाले की, महाविद्यालयातील विधार्थी हे प्रतिभावान असतात. त्यांच्यामध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगला विचारमंच मिळतो. महाविद्यालयातील स्नेहसंमेलन विद्यार्थ्यासाठी कलागुण सादर करण्याची एक सुसंधी असते. स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास होतो असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले. स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाल स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रा. कल्याणी पटवर्धन, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे, डॉ. बी.बी.कायरकर, डॉ. आर. आर. मंडल, प्रा.दिवाकर मोहितकर उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यानीं एकल नृत्य, समूह नृत्य, रॅम्प वाक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना पारितोषिक देण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षण राजेश कैथवास व सौ अरुणा राजूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभांगी भेंडे यांनी केले. संचालन कु. बरखा यादव हिने तर आभार प्रा. योगेश टेकाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)