उद्यापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीच्या वेळेत बदल, सकाळची सफारी सकाळी 5:30 ते 9:30 तर दुपारी 3:00 ते 7:00 वाजेपर्यंत असणार (Change in safari timings in Tadoba - Andhari Tiger Reserve from tomorrow, morning safari will be from 5:30 am to 9:30 am and afternoon safari from 3:00 pm to 7:00 pm)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर हे उष्णतेच्या बाबतीत राज्यात अव्वल ठरले असून येत्या काही दिवसात आणखी तापमानात वातावरणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्णतेचा पारा ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. परिणामी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्र सफारीच्या वेळेत गुरुवार २० एप्रिलपासून बदल केला आहे. कोरमध्ये सकाळची सफारी पहाटे ५.३० ते सकाळी ९.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ७ अशी राहणार आहे. चंद्रपूर शहरात उन्हाचा पारा ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने या शहरात दुपारी १२ वाजतापासून संचारबंदी लागू केल्यासारखी स्थिती असते. वाढलेल्या उन्हाचा तडाखा आता पर्यटन व्यवसायालासुद्धा बसायला सुरुवात झाली आहे. ताडोबात सफारीसाठी येणारे पर्यटक ४३.६ अंश सेल्सिअस तापमान बघून घाबरले आहेत. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना उन्हाच्या तडाख्याचा फटका बसू नये म्हणून ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल केल्याचे ताडोबा कोरचे उपसंचालक नंदकिशोर काळे यांनी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)