बल्लारपुरात बुध्द जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन
बुध्द पौर्णिमा समारोह समितीच्या वतीने "फिक्सिंग" दोन अंकी नाटकाचं आयोजन
बल्लारपूर :- बुध्द पौर्णिमा समारोह समिती पेपर मिल बल्लारपूर, ही मागील 40 वर्षांपासून बल्लारपुरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे पेपर मिल उद्योगाद्वारे घेण्यात येणारे उपक्रम म्हणजे विशाल मेला असो की, फ़ुटबाल टूर्नामेंट असो बल्लारपूर शहरात याच विशेष आकर्षण असते. कालांतराने फ़ुटबाँल टूर्नामेंट व विशाल मेला बंद झालं असलं तरी मागील 40 वर्षापासून बुध्द पौर्णिमा समारोह समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात येतें या समितीच्या वतीने यापूर्वी " अंगुलीमाल, संवाद युगनायकाचा " सारखे महानाट्य पार पडले आहे.
दोन वर्षाच्या कोविडच्या काळानंतर यावर्षी बुध्द पौर्णिमा समारोह समितीच्या वतीने बल्लारपूर पेपर मिल कला मंदिर च्या रंगमंचावर येत्या 16 मे ला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं आहे याअंतर्गत सायंकाळी 6:00 वाजता बल्लारपूर शहरातील स्थानिक कलावंताच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक क्षेत्रातील कार्याला अनुसरून विविध 8 विषयावर पथनाट्य सादर कऱण्यात येणार आहे भारतीय संविधान, पाणी समस्येवर उपाययोजना, आर्थिक धोरण, शिक्षण विषयक विचार, राजकीय विचार, स्त्री विषयक विचार, सामाजिक विचार ई वर स्थानिक कलावंत पथनाट्य सादर करतील त्यानंतर सायंकाळी 7:00 वाजता अतिथींचे मार्गदर्शन होईल या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रविण कांबळे(डॉ.आंबेडकर विचारधारा, नागपूर विद्यापीठ व संपादक (साप्ताहिक निळाई), मा. दीप्ती सूर्यवंशी पाटील, उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर, मा. उमेश पाटील, पोलिस निरीक्षक बल्लारपूर, मा. उदय कुकडे, युनिट हेड, बिजीपीपीएल, बल्लारपूर, मा. प्रवीण शंकर,(जिएम,एच आर, बिजीपीपीएल, बल्लारपूर, मा.अजय दुरुगकर,(डीजीएम-एचआर), बिजीपीपीएल, बल्लारपूर ई चे मार्गदर्शन होणार आहे तदनंतर सायंकाळी 8:00 वाजता प्रबुध्द रंगभूमी नागपूर, प्रस्तुत व संजय सायरे लिखित दोन अंकी नाटक "फिक्सिंग, एक सामाजिक वाताहत" सादर होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आव्हान बुध्द पौर्णिमा समारोह समितीने पत्रकार परिषदेतून केले आहे यावेळी पत्रकार परिषदेला एड. पवन मेश्राम, रितेश बोरकर, श्रीनिवास मासे, सूरज बेताल, विनायक देठे, विजय खोब्रागडे, विकास जयकर, रमेश पडवेकर, ई ची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या