बल्लारपुरात बुध्द जयंतीच्या पर्वावर "बुद्धपहाट"व धम्म प्रबोधन" कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपुरातील भिक्षु निवास पाली विद्यालय(बुध्द विहार) समोरील पटांगणावर 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात बुध्द जयंतीच्या पर्वावर "बुद्धपहाट"व धम्म प्रबोधन" कार्यक्रमाचे आयोजन

बल्लारपुरातील भिक्षु निवास पाली विद्यालय(बुध्द विहार) समोरील पटांगणावर 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन

बल्लारपूर :- भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती विद्या नगर वार्ड बल्लारपूरच्या वतीने बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बुद्ध जयंतीच्या दिनी दी.१६ मे 2022 ला  पहाटे ठीक ५.३० वाजता सुप्रसिद्ध गझल गायक "सुरेंद्र डोंगरे (हिंगणघाट) प्रस्तुत बुद्ध पहाट" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच दी.१७ मे ला सायंकाळी साडेसहा ६.३० वाजता धम्म प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लोकमतचे माजी संपादक धम्मचारी पदमबोधी, नागलोक नागपूर, तथा अनाथपिंडक परिवार चे संस्थापक व  धम्मप्रचारक इंजि. पी.एस.खोब्रागडे नागपूर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे ताराचंद थुल,अशोक दुपारे,जयदास भगत,प्रकाश देवगडे, तुळशीदास खैरे, अंबादास मानकर, भास्कर भगत, संपत कोरडे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)