Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

अमरावतीत पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या पोलिस मुख्यालयाच्या चवथ्या माळया वरुन उडी घेवून आत्महत्या केल्याचे वृत्त

अमरावतीत पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या पोलिस मुख्यालयाच्या चवथ्या माळया वरुन उडी घेवून आत्महत्या केल्याचे वृत्त 

अमरावती :- अमरावती जिल्ह्यात पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे, गेल्या दोन दिवसातील हि दुसरी घटना आहे. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण राठोड (५०) यांनी आज सकाळी पोलीस हेडकॉटर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतक राठोड यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता दाखल करण्यात आलेले आहे.. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी दर्यापूर करीत आहे. काल वलगाव पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. लगेच आज राठोड यांनी देखील आत्महत्या केल्याने पोलीस खात्याला झालंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या