धक्कादायक ! रेल्वेचा कर्मचारी रेल्वेच्या धडकेत ठार, तरीही रेल्वे विभागाच्या उदासीनतेमुळे चक्क 7 तास मृतदेह रेल्वे पटरी वर पडुन होता

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! रेल्वेचा कर्मचारी रेल्वेच्या धडकेत ठार, तरीही रेल्वे विभागाच्या उदासीनतेमुळे चक्क 7 तास मृतदेह रेल्वे पटरी वर पडुन होता 


वरोरा :- वरोरा विभागात रेल्वे च्या धडकेत विविध ठिकाणी 2 व्यक्तींचा जीव गेल्याची घटना घडली सूत्राच्या माहिती नुसार भारतीय रेल्वेत काम करणारा सागर दिलीप झाडे वय 30 वर्ष रा. गाडगेनगर वरोरा येथील रहिवासी असुन वडिलांच्या जागेवर रेल्वेत नौकरीवर लागला मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असावे गुरुवारच्या दुपारी 1:00 वाजताच्या सुमारास सागर हा पटरी वरुन पलीकडे जात असतांना  बल्लारशाह वरून नागपूरला जाणाऱ्या गोरखपूर एक्स्प्रेस ने सागर ला धडक दिली या धडकेत सागरचा घटनास्थळी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहीती रेल्वे चालकाने वरोरा रेल्वे स्टेशनला दिली सदर विभाग बल्लारशाह रेल्वे पोलीस अंतर्गत येत असल्याने वरोरा स्टेशन मास्टरने अपघाताची माहीती बल्लारशाह पोलिसांना दिली मात्र बल्लारशाह रेल्वे पोलिसांनी कर्मचाऱ्याची कमी असल्याचे सांगत घटनास्थळी येण्याचे टाळत सदर घटनेची माहिती वर्धा रेल्वे पोलिसांना देण्याची माहिती वरोरा स्टेशन मास्टरला दिली या उदासीनतेमुळे दुपारी 1:00 वाजताच्या दरम्यान झालेला अपघातातील मृतदेह तब्बल 7 तास घटनास्थळी पडुन होता मरणानंतर ही यातना सहन कराव्या लागल्यात यामुळे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला सागरच्या कुटुंबियांसह अनेकांनी मृतदेह सावलीत ठेवण्याची विनंती करूनही मृतदेह तब्बल 7 तास घटनास्थळी पडून होता उन्हामुळं सागरचा मृतदेह काळा पडला शेवटी नागरिकांचा संताप अनावर झाल्यामुळं घटनास्थळी पोलिस दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले विशेष म्हणजे सागर हा एकुलता एक मुलगा होता 4 वर्षांपूर्वी वडिलांच्या जागी रेल्वेत तो नौकरीवर लागला एका वर्षांपूर्वीच सागरचा विवाह झाला होता मात्र या दुर्दैवी घटनेमुळे झाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संपादक -: दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)