25 जिल्हा परिषदा व 208 नगरपरिषदा, 8 नगर पंचायती प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
नगर परिषदाच्या प्रभाग रचनेवर 14 मे पासून सुनावणी तर 7 जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार !
वृत्तसेवा :- दोन आठवडय़ांत निवडणुकांची प्रक्रिया चालू करा, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग कामाला लागला असून गुरुवारी आयोगाने 25 जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यानां पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तातडीने प्रभाग रचनेचे काम तातडीने हाती घेण्यास जिल्हा प्रशासनाला बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 10 मार्च रोजी जिथे निवडणूक प्रक्रिया आली होती तेथून प्रारंभ करण्यात येत आहे. त्याला अनुसरून आम्ही जिल्हाधिकाऱ्यानां प्रभाग रचनेच्या कामाला प्रारंभ करण्याचे पत्र पाठवले आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नगर, सांगली तर 7 मेपासून पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा तसेच 8 मे 2022 पासून कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यानां मनुष्यबळ पुरवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. मुदत संपलेल्या 208 नगर परिषदा, 8 नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर आलेल्या हरकतींवर 14 मेपासून सुनावणी घेण्यात येणार असून 7 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचना बनविण्यात येणार आहे, असे आयोगाने आज स्पष्ट केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या