अबब ! 50 फुटाचा हायमोस्ट लाईट कारवर कोसळला : वर्धेचे जिल्हा कृषी अधिकारी थोडक्यात बचावले
वर्धा :- देव तारी त्याला कोण मारी' अशीच काहीशी घटना महाराष्ट्र दिनी वर्धा शहर शेजारील सावंगी (मेघे) शिवारात सायंकाळी घडली. पालकमंत्र्यांचा जनता दरबार आटोपल्यावर वाढदिवसाला उपस्थिती दर्शविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे पत्नीसह कारने अमरावतीच्या दिशेने जात होते. कार सावंगी टी-पॉईंट परिसरात येताच ५० फूट उंचीचा हायमास्ट थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कारवर कोसळला. यात अनिल इंगळे यांच्यासह त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या असल्या तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. ते काम निकृष्टच ? सावंगी टी-पॉईंट परिसर रात्रीच्या सुमारास प्रकाशमान राहावा या हेतूने या भागात ठिकठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. अवघ्या काही वर्षांपूर्वी हे हायमास्ट लावण्यात आले आहेत. पण अचानक हायमास्ट कोसळल्याने झालेल्या या विकास कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नच उपस्थित केले जात आहेत. घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी हायमास्ट कोसळून थेट कारवर पडल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने कारमधील घाबरलेल्या दाम्पत्याला बाहेर काढून धीर दिला. शिवाय घटनेची माहिती पोलिसांना दिली. वाहतुकीला लागला होता ब्रेक तब्बल ५० फूट उंचीचा हायमास्ट थेट कारवर कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीला ब्रेकच लागला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत हा हायमास्ट रस्त्याच्या बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष सावंगी टी-पॉईंट भागात राज्य महामार्ग प्राधिकरण विभागाच्या पुढाकाराने हायमास्ट बसविण्यात आले होते. पण त्यानंतर वेळोवेळी देखभाल व दुरूस्तीची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानल्या गेल्याने ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या