अबब ! IPS पतीसोबत राहण्यासाठी पत्नीने सोडले चक्क न्यायाधीश पद : विशेष म्हणजे पती ज्या राज्यात कार्यरत आहे तिथे स्थानिक भाषेत पास केली न्यायिक पदाची परीक्षा अन मिळविले यश

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! IPS पतीसोबत राहण्यासाठी पत्नीने सोडले चक्क न्यायाधीश पद : विशेष म्हणजे पती ज्या राज्यात कार्यरत आहे तिथे स्थानिक भाषेत पास केली न्यायिक पदाची परीक्षा अन मिळविले यश

वृत्तसेवा :- पती- पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून नोकरी करत असतील तर त्यांना एकाच ठिकाणी काम करणे काही वेळा शक्य नसते, त्यामुळे वेगळ्या शहरात नोकरी करावी लागते. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच दिसून येतो. मात्र प्रेम असेल तर जगात काहीही अशक्य नाही. एका उच्च शिक्षित माहिलेने आपल्या पतीसोबत राहण्यासाठी न्यायाधीशाची नोकरी सोडली असून आंध्र प्रदेश राज्यात त्याच पदासाठी त्यांनी पुन्हा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या जिद्दी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. असे म्हणतात की, मनात प्रबळ इच्छाशक्ती, तळमळ आणि काहीतरी करण्याची इच्छा असेल तर काहीही शक्य आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई येथे दिवाणी न्यायाधीश निकिता सेंगर यांनीही असेच काहीसे केले आहे. तिचे पती आंध्र प्रदेश केडरचे आयपीएस असल्याने आणि त्यांना एकत्र राहावे लागत असल्याने त्यांनी यूपी न्यायिक सेवा सोडण्याचा निर्णय घेतला. तेलुगू भाषा शिकून आंध्र प्रदेश न्यायिक सेवेत चौथा क्रमांक मिळवून पतीसोबत नोकरी सुरू केली आहे. यूपी न्यायिक सेवा २०१८ बॅचच्या दिवाणी न्यायाधीश निकिता सेंगर या हरदोई येथे कार्यरत आहेत. निकिताचे पती तुहिन सिन्हा हे आंध्र प्रदेशात आयपीएस अधिकारी आहेत. दोघांनी पूणे येथील आयएलएस लॉ कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. त्यानंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले होते. दिवाणी न्यायाधीश निकिता पूर्ण समर्पणाने तेलुगु भाषा शिकली कारण तिचा पती तुहिन याच्या केडर बदलण्याची शक्यता शून्य होती. त्यानंतर आंध्र प्रदेश न्यायिक सेवेसाठी अर्ज केला. निकाल येताच तिची पतीसोबत राहण्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्या आंध्र प्रदेशच्या न्यायिक अधिकारी झाल्या. त्यामुळे आता यु.पी न्यायिक सेवेचा राजीनामा देऊन आंध्र प्रदेशात न्यायाधीश म्हणून काम करत आहे. निकिता आणि तुहीन या दोघांचे नातेवाईक लखनौचे आहेत. निकिताचे वडील आरएस सेंगर हे सहकार खात्यात उपायुक्त आहेत. तर तुहीनचे वडील व्ही.एन. सिन्हा हे अतिरिक्त विक्रीकर आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)