वृत्तसेवा :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी हक्क मिळवून देणारे, भारतीय समाजाला अज्ञान आणि अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे, हिन दिन दलित दुर्बल आणि श्रमिकांना आवाज देणारे, गुलामगिरीत ज्यांच्या हजारो पिढ्या गाडल्या गेल्या त्यांना जागं करणारे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं सांगतानाच ," १४ वर्षा पर्यंत च्या मुला मुलींना मोफत, सार्वत्रिक व सक्तीच्या शिक्षणाची संविधानात तरतूद करणारे, कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडताना आरोग्य, शिक्षण, शेती, जलसिंचन, ऊर्जा, रस्ते यासाठी संविधानात मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करणारे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. पराकोटीची विषमता असलेल्या भारतीय समाजाला संविधानाच्या एका सुत्रात बांधण्याचे महाकठीण काम कोणतीही कटुता येऊ न देता पूर्ण करून जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना निर्माण करणारे घटनेचे शिल्पकार... बाबासाहेब, खरं सांगायचं म्हणजे या देशातील बहुजन समाज आज स्वाभिमानाने जगत आहे तो फक्त तुमच्या मुळेच. बाबासाहेब तुमचे उपकार येणार्या लाखो पिढ्यांना पुरून उरणारे... बाबासाहेब आमचा दिवस सुरू होतो तुमचं नाव घेऊन आणि दिवस मावळतीला जातांनाही तुमचेच नाव ओठांवर असते. आम्हाला एक संसार उभा करतांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते पण बाबासाहेब तुम्ही कोट्यावधी लोकांचे पिढ्यानुपिढ्यांचे संसार उभे केले.... बाबासाहेब कसं सांगू तुम्हाला आजच्या काळातील साधे नगरसेवक सुध्दा त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढी कमाई करतात. बाबासाहेब तुम्ही मात्र दिनदुबळ्यांच्या ताटात दोन वेळेचे जेवन मिळवून देण्यासाठी सत्ता असो अथवा नसो रात्रंदिवस संघर्ष केलात. खरं सांगायचं तर आम्ही आज सुखाने जे चार घास खातो ना ही केवळ तुमचीच पुण्याई. तुम्ही आमची ऊर्जा आणि प्रेरणेचा शाश्वत स्त्रोत ....तुम्ही म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर...आज संपूर्ण विश्व तुमची जयंती साजरी करीत आहे. पण बाबासाहेब आज संपूर्ण मानवजातीला कोरोना व्हायरस ने परेशान केले आहे. जागतिक महामारिचे हे संकट आपल्या भारतापर्यंत आले आहे. म्हणून बाबासाहेब तुम्ही दिलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून आणि तुम्ही सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात ठेवून या वर्षीची जयंती आम्ही आमच्या घरीच परंतु ऑनलाईन साजरी करणार आहोत. या वर्षाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा एक आगळा वेगळा अनुभव असेल आणि ऑनलाईन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा विक्रम सुध्दा होणार आहे... घरातच राहू या आणि घरोघरी ज्ञानदीप लावून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू या. जयंती निमित्त !!संविधानाचे जनक! भिमराव रामजी आंबेडकर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068












टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या