रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू , वेकोलीच्या बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरातील घटना

Vidyanshnewslive
By -
0

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू , वेकोलीच्या बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरातील घटना

बल्लारपूर :- वेकोलीच्या बल्लारपूर रेल्वे सायडिंग परिसरातील एक धक्कादायक व दुर्दैवी घटना घडल्याची माहिती असून आज दि.०८ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान वेकोलीच्या बल्लारपूर सायडिंग कडून येणाऱ्या रेल्वे ने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे सूत्राच्या माहितीनुसार सदर युवकाचे नाव दिलीप वर्मा वय-२२ वर्ष असून तो बल्लारपूर शहरातील डॉ.आंबेडकर वार्ड येथील निवासी आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली असून या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे मात्र या दुःखद घटनेमुळे या परिसरात शोकमग्न वातावरण पसरले आहे. विशेष बाब म्हणजे सदर युवक रेल्वे लाईन परिसरात गेलाच कशाला, तो यावेळी एकटा होता की आणखी कुणी त्याच्या सोबत होते अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा शोध पोलीस करीत आहे.(सदर बातमीत फोटो प्रतिकात्मक स्वरूपात घेतला आहे.)

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)