बल्लारपूरातील भिक्षुनिवास पाली बुध्द विहारात सतत १४ तास अभ्यास करुन विध्यार्थ्यांनी केले महामानवाला अभिवादन केले

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूरातील भिक्षुनिवास पाली बुध्द विहारात सतत १४ तास अभ्यास करुन विध्यार्थ्यांनी केले महामानवाला अभिवादन केले 



बल्लारपूर :- विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सतत १८,१८ तास अभ्यास करुन जागतिक किर्तीचे विद्वान ठरले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सतत १४ तास अभ्यास करून विध्यार्थ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. भिक्षुनिवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती बल्लारपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि.मा.राजेश सोनोने यांनी जीवनातील प्रसंग सांगून विध्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत निराश न होण्याचा सल्ला दिला. सामाजिक कार्यकर्ते मा.डॉ.राकेश गावतुरे म्हणाले की विध्यार्थ्यांनी आपले धेय्य निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी परिश्रम घ्यावे तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकाव धरु शकू. अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ. किरण वानखेडे यांनी आपल्या विस्तृत मार्गदर्शनातून विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्राची माहिती दिली. समिती तर्फे विध्यार्थ्यांना चहा, व भोजन देण्यात आले. रात्री १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर भगत,संपत कोरडे,ताराचंद थुल ,प्रकाश देवगडे, तुळशीदास खैरे,किशोर लोणारे आदींनी परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)