अजानचा भोंगा वाजताच भीमजयंतीचा डीजे थांबवला आंबेडकरी अनुयायांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश !
मुंबई :- सध्या महाराष्ट्रात भोंग्यावरून व हनुमान चालींसा वरून राज्यभरात वातावरण तापले आहे एकीकडे हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणारे मस्जिद वरील भोंगे काढण्यासाठी तारखा जाहीर करत आहे राज्यातील सामाजिक सलोखा निर्माण असतांना काही राजकीय पक्ष जाती धर्माच्या नावावर राजकारण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच मुंबईच्या चेंबूर च्या पी.एल.लोखंडे मार्गावरील महात्मा फुले नगर क्र.१ मधील सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी सुखदायक अशी घटना घडली आहे. नुकत्याच झालेल्या १३१ व्या विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महात्मा फुले नगर मधून विद्युत रोषणाई डीजे सह भव्य दिव्य मिरवणूक निघाली डीजे च्या तालावर भिम अनुयायी थिरकत होते त्याचवेळी रस्त्यात जातांना एका मस्जिदीत मुस्लिम बांधव आपली नमाज(प्रार्थना) करत होते अजान चा आवाज भिम अनुयायांच्या कानावर पडताच मिरवणुका जाग्यावरच थांबल्या व आयोजकांनी डीजे बंद केला व अजान पूर्ण होईपर्यंत अनुयायांना शांत राहण्याचं आवाहन केलं त्याला प्रतिसाद देत डीजे च्या तालावर थिरकत असलेली तरुणाई शांत झाली व अजान संपल्यावर पुन्हा डीजे लावून मिरवणूक पुढे निघाली याबाबतचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं वृत्त असून भिम अनुयायांच्या या कृतीमुळे संबंधित मंडळाच, आयोजकांचा व आंबेडकरी अनुयायांचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी बोलतांना आयोजक म्हणाले की " महामानवाने आम्हाला कायदा व धार्मिक एकोपा राखण्याचं संदेश दिला तसेच कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचं पालन करण्याच संदेश दिला आम्ही आमचा कर्तव्य पार पाडले."
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या