अबब ! विद्यार्थी कुठं कुठं बसून अभ्यास करतात व अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात !
वृत्तसेवा :- स्पर्धा परीक्षा म्हटलं की कष्ट करणारेही आलेच. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत काही नवीन नाही. सध्या अशाच मेहनती विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतायत. बिहारच्या घराघरांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं-मुली आहेत. बिहार राज्यच मुळात या कारणासाठी ओळखलं जातं. देशात जितक्या मोठ्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या ही बिहारच्या विद्यार्थ्यांची असते असं म्हटलं जातं. रेल्वेच्या आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेला देशातून १.१५ करोड विद्यार्थी बसलेत त्यातले तब्बल ५ लाख विद्यार्थी हे एकट्या बिहार राज्यातून आहेत.काही दिवसांपूर्वी उद्योगपती हर्ष गोएन्काने एक फोटो ट्विट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालाय. या फोटोतील मुलं ही बिहारची राजधानी पाटना मधील आहेत. गंगा नदीच्या काठावर बसून अभ्यास करणाऱ्या या मुलांचा फोटो हर्ष गोएन्का यांनी शेअर करत म्हटलंय,' पटना, बिहारमधील मुलं गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून स्पर्धा परीक्षांची तयार करतायत.आशा आणि स्वप्नांचा हा फोटो आहे.' रिपोर्ट्स नुसार फोटोमध्ये दिसणारे विद्यार्थी हे बरेचशे पटना युनिव्हर्सिटी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी रोज पहाटे ४ ते ६ या वेळेत गंगा घाटावर एकत्र येतात आणि तिथे बसून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पटना विश्वविद्यालय आणि या विद्यापीठाशी संबंधित मान्यता प्राप्त असलेले अनेक कॉलेजेस गंगा किनारी स्थित आहेत. खूप दिवसांपासून अनेक विद्यार्थी इथे पहाटे येऊन अभ्यास करतात. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसून अभ्यास बिहारच्या मुलांचा असा फोटो पहिल्यांदा वायरल झालेला नाही.
बरेचदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा फोटो वायरल झालेला आहे. २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात एका आयएएस अधिकाऱ्याने देखील असाच एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता ज्यात विद्यार्थी चक्क बिहार राज्यातील सासाराम रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसून अभ्यास करताना दिसून आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या