आरडी एजन्टच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकुन केली लूटमार ! ब्रम्हपुरी येथील घटना
चंद्रपुर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून बँकेचा निधी जमा करणाऱ्या आर डी एजन्ट वर पाळत ठेवून असलेल्या 2 व्यक्तींनी दुचाकीने येत आर डी एजन्ट च्या डोळ्यांत मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळील 1 लाख 63 हजार रुपयाची लुट केल्याची घटना 25 एप्रिल ला सकाळी 10:00 च्या दरम्यान घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे या संदर्भातील अधिक माहितीनुसार ब्रम्हपूरी शहरातील श्री संजय देवाजी कुळसंगे हें सेंट्रल बँक व आयसिआयसिआय बँकेचे एजन्ट असुन शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिका कडुन रक्क्म जमा करत असतांना शहरातील एका पेट्रोल पम्प जवळ 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीं वरून आलेत व त्यानी कुळसंगे यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळ असलेले 1 लाख 63 हजार रु रक्कम घेऊन पसार झाले या बाबत कुळसंगे यांनी ब्रम्हपूरी पोलिसात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या