धक्कादायक ! चंद्रपुरातील इंडस्ट्रीयल प्रभागात पत्नीने केली पतीची हत्या
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस हद्दीतील इंडस्ट्रीयल प्रभागातील एक धक्कादायक घटना घडली असून पत्नीने आपल्या दारुड्या पतीची हत्या केली असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. सदर घटना चंद्रपूर-मूल मार्गावरील असून सततच्या कौटुंबिक वाद व पतीला असलेले आवाक्याबाहेरचे दारूचे व्यसन यामुळं त्रासलेल्या पत्नीने काल १४ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास सदर घटना घडली मात्र आज १५ एप्रिलला सकाळच्या सुमारास घटना उघडकीस आली. या संदर्भातील अधिक माहितीनुसार बंगाली कॅम्प जवळच्या इंडस्ट्रीयल प्रभागात जलसंपदा विभागा अंतर्गत विदर्भ पाटबंधारे विकास नागपूर कार्यालय लगत सदर कुटुंबीय किरायाने राहत असल्याची माहिती आहे. या घटनेतील मृतक अलकराम मनिराम राऊत हे छत्तीसगड मधील वास्तव्यास असलेले व रोजगाराच्या शोधात चंद्रपुरात दाखल झालेले या परिसरात किरायाने राहत होते मृतक हा मिस्त्रीचे काम करीत होता पती-पत्नी मध्ये सतत भांडण व्हायचं शिवाय या काळात मृतकाच्या दारूच्या व्यसनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती होती व या वादातूनच काल १४ एप्रिलला पती व पत्नीत जबर धक्काबुक्की झाली यामुळे दारूच्या नशेत असलेला पती खाली पडला यामुळं पतीच्या डोक्याला जबर मार लागला त्यातच पत्नीने लाकडी वस्तूने ही मारहाण केल्याचा माहिती आहे. व या मारहाणीत च पतीचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे या घटनेची माहिती आज सकाळी उघडकीस येताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आला या हत्येप्रकरणी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून या संबंधीचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068












टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या