चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षल प्रभावित असलेल्या ९ तालुक्यापैकी आता ३ तालुके नक्षल प्रभावित असणार उर्वरित ६ तालुक्यांना वगळणार ?
चंद्रपूर :- महाराष्ट्र सरकारने २००५ च्या नक्षल प्रभावित क्षेत्रानुसार यादीची रचना करतांना चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपीपरी, मूल, राजुरा, पोंभुरणा, जिवती, कोरपना, सावली हे तालुके नक्षल प्रभावित घोषित करण्यात आले होते मात्र विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार राज्य सरकार नक्षल प्रभावित क्षेत्राचा पुनर्विचार करून राज्य सरकार नव्याने पुन्हा नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नक्षल प्रभावित असलेल्या तालुक्यापैकी ६ तालुके वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात आता राजुरा, कोरपना व जिवती तालुके नक्षल प्रभावित क्षेत्रात असणार आहे या सोबत गोंदिया जिल्ह्यातील ४ तालुके( गोंदिया, देवरी, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव), तर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुके ही नक्षल प्रभावित क्षेत्राच्या यादीत असणार आहे एकूण विदर्भातील १९ तालुके ही नक्षल प्रभावित क्षेत्र राहणार आहेत याशिवाय राज्य सरकार नक्षल प्रभावित क्षेत्राचा पुनर्विचार करून यवतमाळ, नांदेड व भंडारा जिल्ह्यांना नक्षल प्रभावित यादीतून हटविण्यात येणार आहे. मागील ४ ते ५ वर्षांपासून या जिल्ह्यात नक्षल संबंधित कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नव्या यादीबाबत शासनाने ७ दिवसात उत्तर पाठविण्याचं आवाहन केलं आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या