Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय अधिवेशन २४ एप्रिल ला नागपुरातील वनामती सभागृह, धरमपेठ मध्ये पार पडणार !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय अधिवेशन २४ एप्रिल ला नागपुरातील वनामती सभागृह, धरमपेठ मध्ये पार पडणार !

वृत्तसेवा :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय अधिवेशन २४ एप्रिल २०२२ ला नागपुरातील वनामती सभागृह, व्ही.आय.पी रोड, धरमपेठ या ठिकाणी सकाळी ११:०० ते ६:०० वाजेपर्यंत पार पडत आहे. सदर अधिवेशन २ सत्रामध्ये पार पडणार आहे अशी माहिती विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष,  यांनी दिली आहे यावेळी अनुपकुमार भार्गव, शरद नागदेवे, डॉ.आनंदकुमार शर्मा, नरेंश बोपचे, विनायकराव इंगळे, कैलाश निघोट यांच्या सह विदर्भाचे पदाधिकारी उपस्थित होते. या विदर्भस्तरीय अधिवेशनाला राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ई च्या उपस्थितीत पार पडणार आहे तरी या अधिवेशनाला विदर्भातील सर्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पत्रकार संघाचे सदस्य ई नी आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष, डॉ.आनंद शर्मा, संघटक पूर्व विदर्भ, शरद नागदेवे, सरचिटणीस पूर्व विदर्भ, प्रदीप रामटेके उपाध्यक्ष पूर्व विदर्भ विदर्भातील सर्व जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ई ची यावेळी उपस्थिती होती.










संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या