बल्लारपूरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, रात्री उशिरापर्यंत अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन !
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पासून पथसंचलन करण्यात येवून नगर परिषद बल्लारपूर परिसरातील बाबासाहेबांच्या स्मारक परिसरात महामानवाला अभिवादन करण्यात आले तसेच नगर परिषद बल्लारपूर, तहसील कार्यालय बल्लारपूर, पोलीस स्टेशन बल्लारपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय बल्लारपूर, ई सह विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयात महामानवाला जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, सह अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले. १३१ व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांनी भोजनदान, सरबत वितरण, थंड पिण्याचे पाणी, मिठाई वाटप करण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत शहराच्या अनेक परिसरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुकीच्या स्वरूपात अनुयायी येत होते. यावेळी बल्लारपूर पोलीस विभागाच्या वतीने सकाळी ६:०० वाजता पासून तर रात्री उशिरा पर्यत चोख व्यवस्था राखण्यात आली होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068













टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या