अबब ! चोरटयांनी फोडला चक्क चंद्रपूरच्या खासदारांचा बंगला, जिथे सुरक्षाव्यवस्था असतांना खासदारांचा बंगला फोडला जातो तिथं सामान्य माणसाचं काय ? सरकारनगर मधील 2 घरावर हात साफ़, पोलिसांनी केली 3 व्यक्तींना अटक

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! चोरटयांनी फोडला चक्क चंद्रपूरच्या खासदारांचा बंगला, जिथे सुरक्षाव्यवस्था असतांना खासदारांचा बंगला फोडला जातो तिथं सामान्य माणसाचं काय ? 

सरकारनगर मधील 2 घरावर हात साफ़, रामनगर  पोलिसांनी केली 3 व्यक्तींना अटक 

चंद्रपूर :- शहरातील चोरट्यांनी थेट खासदारांच्या बंगल्यात घरफोडी केली. मात्र, त्यांना तिथे काहीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चोरट्यांनी बंगल्यातील सामानाची तोडफोड करत आपला संताप व्यक्त केला. या तिन्ही चोरट्यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांनी इतर ठिकाणी देखील घरफोडी केल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा सरकारनगर येथे सुर्यकिरण नावाचा बंगला आहे. तसेच त्यांच्या याच बंगल्यामध्ये त्यांचे कार्यालय होते. निवासासाठी खासदार बाळू धानोरकर याचा अजूनही वापर करतात. खासदार धानोरकर हे मंगळवारी मुक्कामी नव्हते ते वरोऱ्याला रात्री निघून गेले होते. बंगल्याच्या चौकीदारांने दुसऱ्या दिवशी नऊ वाजता भ्रमणध्वनीवरून बंगल्यामध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून बंगल्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि बंगल्यामधील इतर खोल्याचेही कुलूप त्यांनी तोडले होते. पण मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. काही सापडलं नसल्याने बंगल्यातील इतर सामानाची नासधूस त्यांनी केली आणि कपाटही फोडले आहे. या घटनेची तक्रार बंगल्याच्या चौकीदाराने रामनगरमधील पोलिसांत दाखल केली. त्याच रात्री सरकारनगरमध्ये आणखी दोन घरफोड्या झाल्या होत्या. कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यामध्ये चोरट्यांनी चोरी केल्याने पोलिस यंत्रणा हादरली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या बंगल्यामधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. तेव्हा दिसले की, चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. रामनगर पोलिसांनी बारा तासाच्या आतमध्ये या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. रोहीत इमलकर (वय २४, रा. दुर्गापूर), शंकर नेवारे (वय २०, रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (वय २०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) ही आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अशा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यावेळी चक्क चोरांनी खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सरकारनगर परिसरातील नागरिक खूप घाबरले आहेत. चोरटे काही दिवस खासदार बंगल्यावर कधी येतात व कधी जातात यावर लक्ष ठेवून होते. याबद्दलची माहिती काढली होती. त्यामुळे खासदार धानोरकर नसताना त्याच्या घरामध्ये घुसण्याचे धारिष्ठ केले. पण मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही. या चोरट्या आणखी कुठे कुठे घरफोड्या केल्या याबद्दलची माहिती चोकशीनंतर समोर येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज),  मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)