वर्ध्यातील असही एक गाव जिथे रंग न उडवता ही केलं जातं अनोख धुलिवंदन !
वर्ध्यातील सुरगाव मध्ये मागील २५ वर्षांपासून धुळीवंदनच्या दिवशी केला जातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार
वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे धुलिवंदन साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा सोहळा साजरा केला गेला. येथील नागरिकांनी रंगांची उधळण न करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून येथील गावकरी इतर गावांप्रमाणे होलिका दहन किंवा रंग उधळत जोरजोरात गाणे वाजवत होळी साजरी करणे पसंत करत नसून धुलिवंदनच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून गाव आदर्श बनविण्यासाठी येथील गावकरी प्रयत्न करतात. त्यासाठी दरवर्षी पहाटे राष्ट्रसंतांची पार्थना त्यानंतर प्रभातफेरी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. विशेषतः यात गावातील चिमुकल्यांचा मोठ्या उत्साहात सहभाग असतो.
मागील वर्षी कोरोनामुळे पडला होता खंड या गावातील आदर्श असा धुलिवंदन सोहळ्यावर कोरोनाने विरजण घातलं होतं आणि दरवर्षी प्रमाणे प्रभातफेरी आणि गर्दीचे कार्यक्रम आयोजित करता आले नव्हते. मात्र या वर्षी पुन्हा नव्या उत्साहात नव्या आनंदात गावकऱ्यांनी एकत्रीत येत प्रभातफेरी काढली आणि भजने आणि अनेक गीत गाऊन धुलिवंदन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केले. यावेळी "आम्ही आम्हाला धन्य समजतो की आम्ही सुरगावचे रहिवासी आहोत " अशा प्रतिक्रिया व्यक्त करत गावकऱ्यांनी दिल्या. मागील २० ते २५ वर्षांपासून सुरू असलेल्या सुरगांव येथील आदर्श अशा रंगाविना धुलिवंदन सोहळ्याची ख्याती संपूर्ण विदर्भात पोहचली आहे. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अनोखा असा रंगाविना धुलिवंदन सोहळा साजरा केला जातो.होळी पेटवणे म्हणजे नैसर्गिक संपत्तीची म्हणजे निसर्गातील झाडांची हानी आणि धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे निसर्गाला धोक्यात घालून सण उत्सव साजरे करणे गावकऱ्यांना पटत नाही आणि देवाने दिलेला सुंदर देह होळीचा रंगानी का खराब करायचा म्हणूनही धुलिवंदन साजरे केले जात नाही. असं गावकरी सांगतात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या