महाराष्ट्र सरकारचा शाळेबाबत महत्वाचा निर्णय : शाळा आता रविवार ला ही सुरू असण्याचे संकेत, तसेच एप्रिल अखेर पर्यत सुरू राहण्याची शक्यता ?
मुंबई :- राज्यात कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असताना राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात शाळा बंद होत्या. राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले होते. आता राज्यातील सर्व शाळा १०० टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या या परिपत्रकात आता यापुढे रविवारीही शाळा सुरु ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळा १०० टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय एखाद्या शाळेला रविवारी शाळा भरवायची असेल तर त्यासाठी देखील परवानगी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात, असे देखील आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवण्याची परवानगी असेल, असे देखील सांगण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. परंतु काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या