महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केवळ पाणी पिण्यासाठी नव्हे तर माणसाच्या मूलभूत हक्कासाठी केलेला सत्याग्रह होय - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वृत्तसेवा :- जिथे गुरे-ढोरे जनावरांनाही पाणी पिण्यास मुभा होती तिथेच अस्पृश्याना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला व याच संघर्षातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी महाडच्या " चवदार तळ्याचा " सत्याग्रह करावा लागला २० मार्च १९२७ रोजी, महाड चवदार तळे सत्याग्रह,आपण सर्वजण हा दिवस महाड चवदार तळे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह केला असे म्हणतो परंतु,प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी,रायटींग एन्ड स्पीचेस,या ग्रंथामध्ये पहिल्याच, पानावर सांगितले आहे,की मी पाणी पिण्यासाठी सत्याग्रह केलं नाही.मग हे सत्याग्रह कशाचं होतं,मानव मूलभूत हक्कासाठी केलेले हे सत्याग्रह होते, आणि मेलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी आपल्या बापाने,प्रज्ञासूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे सत्याग्रह,केले होते, चवदार तळ्याचे पाणी,बोलेकमिशन महाड मुन्सिपल पार्टी नो १९२४ साली चवदार तळे,सार्वजनिक तळे म्हणून घोषित केले,परंतु या चवदार तळ्याला माणसा सारखे माणसं असूनही सुद्धा या पाण्याला हात लावण्याची हिंमत करत नव्हते,जनावरांना या चवदार तळे मधले पाणी पिण्याचा अधिकार होता, परंतु माणसा सारख्या माणसाला,या चवदार तळ्याच्या पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, १९२४ ते १९२७ पर्यंत,एकही व्यक्ती या पाण्याला हात लावण्यासाठी हिम्मत करत नव्हते,बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही माणसासारखे माणूस असून सुद्धा. या पाण्याला का बर तुम्ही हात लावत नाही.
त्यावेळेस बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा या माध्यमातून प्रत्येक गावोगावी जाऊन मीटिंग घेतल्या आणि आपल्या मेलेल्या समाजाला,जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या जिवाची पर्वा न करता,आपल्या हक्कासाठी,आपल्या न्यायासाठी, या समाजासाठी,आपल्याला आपल्या बापाने अधिकार मिळवून दिले, या संपूर्ण जगामध्ये पाणी पिण्याचा संघर्ष,या दोनच व्यक्तींना केले एक (इसवी सन पूर्व ५८३ व्या वर्षी सिद्धार्थ गौतम,म्हणजेच भगवान बुद्ध यांनी रोहिणी नदी च्या पाण्यामुळ) (कोलिय विरुद्ध,शाक्य संघ ) यांच्यामध्ये खूप मोठा संघर्ष झाला होता,या गोष्टीमुळे शक्य संघांनी, कुलिया विरुद्ध युद्ध करण्याचे, विचार केला परंतु सिद्धार्थ गौतमाला तो,अमान्य होता,शक्य संघाचे सभासद असल्यामुळे त्यांना,एकतर कुलिया विरुद्ध युद्ध करणे,आणि दुसरा पर्याय होता,देशत्याग करणे,सिद्धार्थ गौतमाने,देश त्याग स्वीकारला,परंतु युद्ध करण्यासाठी नकार दिला,आणि आपल्या स्वतःच्या राज्यांमधून, कपिलवस्तु नगरी मधून, हमेशा साठी,गृहत्याग केला,रोहिणी नदीमुळे,या जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्धाला सुद्धा,देशत्याग, गृहत्याग करावा लागले,या संपूर्ण जगामध्ये दोनच बोधिसत्व अशी आहेत की,ज्यांनी पाण्यासाठी संघर्ष केले,,( एक भगवान बुद्ध ,आणि दुसरे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर ), महाडचे चवदार तळ हे सार्वजनिक होतं परंतु उच्चवर्णीय ब्राह्मण यांनी हे तळे स्वतःच्या मालकीचे,असल्याचा दावा केला होता आणि हे प्रकरण कोर्टामध्ये सुद्धा गेले होते परंतु हे चवदार तळे सार्वजनिक असल्याचा कोर्टाने निकाल दिला,, आपल्या बापाने या चवदार तळ्याला स्पर्श करून समस्त मानव जातीसाठी,२० मार्च १९२७ ला सर्वांसाठी खुले केले तेव्हापासून,हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे,याच दिवशी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्या मेलेल्या समाजाला, जीवनदान दिले,आणि या चवदार तळ्याचे पाणी पाजून आपल्या सर्वांना,पवित्र केले,आज २० मार्च चवदार तळे सत्याग्रह, प्रज्ञासूर्य विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या,महान कार्याला माझे कोटी कोटी वंदन..💐💐🙏💐💐..
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या