अखेर मनपा आयुक्तावर बेघर होण्याची वेळ आली : जिल्हा प्रशासनाने शासकीय निवासस्थान ताब्यात घेतले, परवानगी शिवाय परिसरात प्रवेश करण्यास बंदी असल्याचा फलक
चंद्रपूर :- चंद्रपूर मनपा आयुक्तांवर बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे भाकीत काही प्रसार माध्यमांनी केले होते. ते भाकीत अखेर खरे ठरले असुन जिल्हा प्रशासनाने मनपा आयुक्तांना निवासाकरिता देण्यात आलेला बंगला जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतला असून चंद्रपूर मनपा आयुक्त बेघर झाले आहेत हे विशेष. मनपा आयुक्तांसाठी हस्तांतरित करण्यात आलेले निवासस्थान रिक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या होत्या मात्र मनपा निवासस्थान वाचाविण्याकरिता न्यायालयात जाण्याचा तयारीत होते. मनपाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने मनपा आयुक्तांना आवंटित बंगला ताब्यात घेतला असून बंगल्याच्या आवारात व परिसरात तहसीलदार चंद्रपूर ह्यांचे परवानगी शिवाय प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई इशारा दिला आहे. महानगरपालिका आयुक्तांसाठी सिव्हील लाईन येथिल एक बंगला रीतसर हस्तांतरित करण्यात आला होता. मनपाने त्यानंतर लाखो रुपये खर्च करून त्या बंगल्याची डागडुजी आणि रंगरंगोटी केली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजय काकडे हे त्या शासकीय निवासस्थानी राहायला गेले होते. त्यांची बदली झाल्यानंतर राजेश मोहिते दोन वर्षे राहिले. मोहितेची अचानक बदली करण्यात आली मात्र त्यांनी अद्यापही हे निवासस्थान सोडलेले नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनी महानगर पालिकेला हस्तांतरित केलेला बंगला परत घेतल्याने या प्रकरणात राजकारण होत असल्याचा वास येऊ लागला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या