कारचालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून दुचाकीला दिली धडक २ गंभीर जखमी, सास्ती मार्गावरील कब्रस्थान जवळील घटना
बल्लारपूर :- राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील वास्तव्यास असणारे व व्यवसायाने शिक्षक असलेले बंडु मारोती पोतराजे वय 52 नौकरी (शिक्षक) रा. बेलगांव ता. भद्रावती येथे कर्मविर विद्यालय येथे शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत नित्यनेमानूसार आज दि.11/3/2022 ड्यूटी जाण्या करिता सकाळी 8:00 वाजता स्वताची गाडी ॲक्टिवा होंडा स्कूटी क्र. MH 34 AS 5356 नी बल्लारपूर करिता सास्ती मार्गे येत असताना वर्धा नदीच्या पुलिया चे समोर कब्रास्तान चे अलीकडे मागुन येणारे अज्ञात कार चालकाने MH 34 BR 0256 ने भरधाव वेगाने व बेदरकार पणाने मागुन धडक मारली व याना गाडीने समोर १० ते १५ पुट पर्यंत फरफटत नेले सदर अपघातानंतर काही व्यक्तींना दोन्ही अपघातग्रस्त पडून असल्याचे दिसताच परिसरातील लोकांनी या जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे हलविण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर बंडु मारोती पोतराजे याला दोन्ही पायाला व डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर जखम असल्यामुळे त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच श्रीमती शारदा रामभाऊ चोधरी वय ४५ रा.कोलगाव यांच्या डाव्या हातात मार लागला असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या