बल्लारपूरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या जनआक्रोश मोर्चा (Jan Aakrosh Morcha tomorrow on behalf of Vanchit Bahujan Aghadi in Ballarpur)
बल्लारपूर :- वंचित बहुजन आघाडी व्दारे दि. 3 नोव्हेंबरला भव्य जन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चा करिता जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश तावाडे शहर निरीक्षक मा. रूपचंदजी निमगडे आदी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहे
1) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका मतपत्रिकेने घेण्यात याव्या.
2) रेल्वे गोल पुलाखालील रस्ता कायमदुरुस्त करण्यात यावा अन्यथा पर्याय मार्गाची व्यवस्था करण्यात यावी.
3) राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्ती करून जनतेकारिता फुटपाथ तयार करण्यात यावे.
4) बुद्ध नगर, संतोषी माता वार्ड येथील सब्जी बाजारातील रस्त्याचा मधला भाग जो डीवाईडर साठी सोडला होता त्यातील काँक्रीट निघालेले आहे त्यामुळे अपघात होत आहे तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा या वरील मागण्यांच्या आशयाचे निवेदन देण्याकरिता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू व महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांनी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बल्लारपूर च्या समस्त जनतेला आव्हान केले आहे की जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या