बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर : नगराध्यक्षासह १७ प्रभागांमधून ३४ नगरसेवकांची निवड होणार २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी - निवडणूक निर्णय अधिकारी अजय चरडे (Ballarpur Municipal Council election schedule announced: 34 corporators from 17 wards, including the mayor, will be elected. Voting will be held on December 2 and counting of votes will be held on December 3 - Returning Officer Ajay Charade)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर : नगराध्यक्षासह १७ प्रभागांमधून ३४ नगरसेवकांची निवड होणार २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी - निवडणूक निर्णय अधिकारी अजय चरडे (Ballarpur Municipal Council election schedule announced: 34 corporators from 17 wards, including the mayor, will be elected. Voting will be held on December 2 and counting of votes will be held on December 3 - Returning Officer Ajay Charade)

बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत १ नगराध्यक्ष आणि १७ प्रभागांमधून ३४ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार रेणुका कोकाटे, तसेच सहायक निवडणूक अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या उपस्थितीत काल ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
            १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांचा स्वीकार करण्यात येईल. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल व प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, अपील सादर करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नगर परिषद कार्यालयात सुरू होईल. या निवडणुकीसाठी ९५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, एकूण ८३,८२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ४२,०६६, स्त्रिया ४२, ७५४ आणि इतर १ मतदार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ५५० कर्मचारी, १२ झोनल अधिकारी (यापैकी २ राखीव), तसेच ४ स्थिर पथके, २ फिरती पथके आणि २ व्हिडिओ शूटिंग पथके तैनात करण्यात आली आहेत. 
          खर्च मर्यादेच्या दृष्टीने नगराध्यक्ष पदासाठी ११ लाख २५ हजार रुपये, तर नगरसेवक पदासाठी ३ लाख ५० हजार रुपये इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन शुल्क अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००० रुपये, तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी २००० रुपये असेल. उमेदवारांना https://mahasecelec.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन नामनिर्देशन फॉर्म भरून त्याची हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक आहे. १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर बल्लारपूर शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)