महिला आरक्षणाचा " बाऊन्सर" अनेकस्थानिक नेत्यांच्या जिव्हारी? जिल्ह्यातील १७ पैकी ८ नगरपरिषद/नगरपंचायती महिलासाठी राखीव (Women's reservation "bouncer" on the lips of many local leaders? 8 out of 17 municipal councils/municipal panchayats in the district are reserved for women)

Vidyanshnewslive
By -
0
महिला आरक्षणाचा " बाऊन्सर" अनेक
स्थानिक नेत्यांच्या जिव्हारी? जिल्ह्यातील १७ पैकी ८ नगरपरिषद/नगरपंचायती महिलासाठी राखीव (Women's reservation "bouncer" on the lips of many local leaders? 8 out of 17 municipal councils/municipal panchayats in the district are reserved for women)

राजकारण :- प्रा. महेश पानसे

वृत्तसेवा :- महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा ' बाऊन्सर' अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांना अंधारी आणणारा ठरला आहे. विशेष करून जिल्ह्यातील १७ पैकी ८ नगरपरिषद, नगरपंचायती विवीध प़वगॅातील महिलांसाठी राखीव करण्यात आल्याने नगराध्यक्ष पदाकडे टक लावून, बाशिंग बांधून बसलेल्या मंडळीची माेठी गाेची हाेणार हे वेगळे सांगायची गरज नाही. महिला आरक्षण घाेषीत झालेल्या नगरपालिकांमध्ये सत्ताधारी भाजप अंतर्गत नगराध्यक्षपदासाठी माेठी संगीत खुचीँ हाेईल तर सत्तेबाहेर असलेल्या पक्षांतील स्थानिक नेते आपल्या कुटुंबियांना मैदानात उतरवून नगराध्यक्षाचे आसन आपले हातात ठेवण्याकरीता दमछाक करावी लागणार असे जाणकार बाेलताना दिसत आहेत. भद्रावती, राजुरा, वराेरा नगरपालिका निवडणुका पुर्वी आयाराम, गयाराम जाेमात राहतील असे राजकीय चित्र असणार 
         मूल शहरातील " ते" बॅनरबाज थंडावले? गत चार महिन्यापासून मूल शहरात राजकीय बॅनरबाजी लय जाेमात आहे. नगरपालिका निवडणुकीची हवा सुरू झाली नंतर
ही बॅनर बाजी अधिक फाेफावली. यात अनेकदा अनेकांनी आपला उल्लेख भावी नगराध्यक्ष म्हणून करण्यात कसर साेडली नाही. महिला आरक्षण निघाले सारे थंडावले का? अशी काेपरखडी सध्या मूल शहरात सुरू दिसते. आता ही मंडळी वार्ड आरक्षणाची वाट बघत आहेत म्हणतात. मूल नगरपालिका नगराध्यक्ष पद पुन्हा एकदा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलां करीता आरक्षीत झाल्यानें शहरवासीयांना जरा खटकले असल्याचे चित्र आहे. कारण गत नगराध्यक्ष पद सुद्धा महिलेसाठी (खुला प्रवर्ग) आरक्षीत हाेते. तेव्हा कांग्रेस ने आरक्षणानुसार खुल्या गटातून उमेदवार दिला होता. 
           भारतीय जनता पक्षाने मात्र यात नामाप्र मधून रत्नमाला भाेयर याना उमेदवारी देवून नगराध्यक्ष पद मिळवले हाेते. आता पुन्हा नामाप़ महिला आरक्षण निघाले असल्या कारणाने शहरातील मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसताे. माजी नगराध्यक्षा साै.रत्नमाला भाेयर यावेळी सुद्धा इच्छुक आहेत असे बाेलले जाते. सत्ताधारी पक्ष असल्याने उमेदवारी करीता बार्शीग बांधून अनेक जण लाईन मध्ये असतील यात शंका नाही माञ सध्यातरी भारतीय जनता पक्षातर्फे साै. किरण कापगते, माजी नगराध्यक्षा साै. रत्नमाला भाेयर, भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडी प्रमुख मनिषा गानलेवार, भाजप महिला शहर आघाडी उपाध्यक्षा सारी कामे वासेकर माजी नगराध्यक्षा साै. उषाताई शेंडे या नावांची चर्चा दिसते. काॅगे़स पक्ष मूल नगरपालिकेतील मुख्य विरोधी पक्ष आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत हे पक्षातर्फे सारे निर्णय घेतील हे जरी खरे असले तरी महिला आरक्षण आल्याने काही ठराविक मंडळी बाहेर सध्या ते विचार करतील असे चित्र नसल्याने नगराध्यक्ष पदाकरिता नजीकच्या सहकारी मंडळीच्या वा आपले कुटुंबीयांना मैदानात उतरवून निवडणूक गाजवू शकतात अशीही चर्चा आहे, भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारासाठी कुणी कितीही उडया मारल्या तरी माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांची ही सहमती माेलाची ठरणार आहे हे नक्की. 
   
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)