रेल्वेच्या धडकेत विसापूरातील व्यक्तीचा मृत्यू (Visapur man dies in train collision)
बल्लारपूर :- रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वे गाडीच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना विसापुर गावात आज, 8 ऑक्टोबर रोजी घडली. मृत इसमाचे नाव मोहन मुरारी अर्जुन कोडापे (वय 62) रा. वॉर्ड क्र. 1 विसापूर असे आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आरपीएफ व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजता मोहन मुरारी कोडापे हे दवाखान्यात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. ते गोंडवाना हॉल्ट स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या तेलंगणा एक्सप्रेस गाडीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविले आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या