बल्लारपूरात दोन दिवसीय धम्म महोत्सवासह प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन (Two-day Dhamma Festival and enlightenment program organized in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात दोन दिवसीय धम्म महोत्सवासह प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन (Two-day Dhamma Festival and enlightenment program organized in Ballarpur)

बल्लारपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेला अभिवादन आणि बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने बल्लारपूर येथे दोन दिवसीय भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २८ आणि २९ ऑक्टोबर २०२५ रोजी विजय स्तंभ परिसर, जयभीम चौक बल्लारपूर येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन भदंत बोधीपालो महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी भदंत विनयबोधी महाथेरो (मुंबई) राहणार आहेत. पहिल्या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, धम्म प्रवचन, भिक्षूंचे मार्गदर्शन आणि धम्मचर्चा यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भदंत सुमनवनो महाथेरो, भदंत करुणाबोधी महाथेरो, भदंत नागदीप महाथेरो, भदंत संघवंश थेरो, भदंत आनंद थेरो, भदंत श्रद्धारक्षित, भदंत रत्नमणी थेरो, भदंत मैत्रीबोधी आणि भिक्खू धम्मप्रकाश संबोधी आदी भंतेजी उपस्थित राहणार आहेत.
         दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजता संघर्ष भगत यांच्या सादरीकरणात बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून, महाराष्ट्रातील प्रख्यात कवी आणि गायक सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. अण्णासाहेब बनसोडे (उपाध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र) राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे राजेंद्र जैन, आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम, राजकुमार बडोले, आमदार अमोल मिटकरी, सुनील मगरे, नितीन भटारकर, राजीव कक्कड, दीपक जयस्वाल, राकेश सोमाणी आणि रंजना पारशिवे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या धम्म महोत्सवाचे मुख्य आयोजक प्रशांत झामरे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – सामाजिक न्याय विभाग) असून, त्यांनी डॉ. आंबेडकरांचे सामाजिक संदेश आणि बौद्ध तत्त्वज्ञान जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)