स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व बल्लारपूर पोलीसांची धडक कारवाई (Local Crime Branch, Chandrapur and Ballarpur police take drastic action)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व बल्लारपूर पोलीसांची धडक कारवाई (Local Crime Branch, Chandrapur and Ballarpur police take drastic action)

बल्लारपूर :- स्थागुशा, चंद्रपूर व बल्लारपूर पोलीसांची धडक कारवाई पोलीस ठाणे बल्लारपूर यांची उल्लेखनिय कामगीरी अशी आहे की, पोलीस ठाणे बल्लारपूर अप क. ९७५/२५ कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.सं. मधील फिर्यादी नामे विनय चंद्रय्या मुलकला रा. मंचेरीयल, राज्य तेलगणा ह.मु. सुभाष वार्ड, बल्लारपूर यांना दि. ०९/१०/२५ रोजी २२:०० वा. च्या सुमारास अज्ञात तिन लोकांनी मारहाण करून त्यांचे हातातील एक मोबाईल व एक सोन्याची अंगठी असा ४०,०००/- रू चा मुद्दे‌माल बळजबरीने चोरून घेवुन गेल्याने फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस ठाणे बल्लारपूर येथे सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासामध्ये स्थागुशा, चंद्रपूर यांनी व पोलीस ठाणे बल्लारपूर यांनी समांतर तपास करून सदर गुन्हयातील दोन आरोपी नामे सचिन सुरेश मोकलवार वय २४ वर्ष, रा. बुध्द नगर वार्ड, बल्लारपूर व करण सुदाम हजारे वय २४ वर्ष, रा. गोरक्षण वार्ड, बल्लारपूर यांना अटक करून त्यांचेकडुन एक सोन्याची ५ ग्रॅम अंगठी किं.अं. ५०,०००/- रू रोख रक्कम ९००/- रू व गुन्हयात वारलेली मो.सा. २०,०००/- रू असा एकुण ७०,९००/-रू चा माल जप्त करण्यात असून तिसरा फरार आरोपीचा शोध चालू आहे. सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे, श्री. सुधीर नंदनवार सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा, पो. निरिक्षक विपीन इंगळे यांचे मार्गदर्शनात सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, सफौ. रणविजय ठाकुर, आनंद परचाके, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, पुरूषोत्तम चिकाटे, सुनिल कामतकर, विकास जुमनाके, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, पो.ना. सचिन अल्लेवार, म.पो. अंमलदार शालीनी नैताम, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने केली असुन पुढील तपास सपोनि शब्बीर पठाणे हे करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)