लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रिया तूर्तास स्थगित, ऑक्टोबरचा हफ्ता पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता ! (Ladki Bahin, e-KYC process postponed for now, October payment likely to be received next week !)

Vidyanshnewslive
By -
0
लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रिया तूर्तास स्थगित, ऑक्टोबरचा हफ्ता पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता ! (Ladki Bahin, e-KYC process postponed for now, October payment likely to be received next week !)

वृत्तसेवा :- विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. सरकारकडून या योजनेच्या लाभार्थींची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. आता 'ई-केवायसी'तून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषांनुसार राज्यभरातील ७० लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या निषकांनुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही. 
          महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअतंर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचा हफ्ता दिला जातो. या योजनेला २८ जून २०२४ ला मान्यता मिळाली. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ च्या मुदतीमध्ये २ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज केले. सहा महिन्यांनंतर निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू करण्यात आली. अशामध्ये आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या योजनेसाठी ई-केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना लाडक्या बहीणींना करावा लागत आहे. या वेबसाईटवरील ई-केवायसी करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. पण लाभार्थी महिलांनी ई-केवायसी कधीपर्यंत करायची त्याची मुदत काय हे अद्याप निश्चित झालेले नाही.






संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)