विसापूर : बल्लारपूर तालुक्यात कृषीक्षेत्र कोरडवाहू आहे. यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला आहे. यावर शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शासनाने दिशाभूल केल्या आरोप बल्लारपूर तालुका व शहर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ऐन दिवाळीच्या दिवशी शेतशिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसह काळी दिवाळी साजरी केली. अनोख्या आंदोलनाने सरकारचे पितळ उघडे पडले. वेळीच नुकसान भरपाई न दिल्याबद्दल निषेध करण्यात आला. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे सर्वश्रुत बोलले जाते.परंतु बल्लारपूर तालुक्यात किन्ही येथील जीवनकला आलाम यांच्या शेत बांधावर ऐन दिवाळीच्या दिवशी कांग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. यावर्षी पर्जन्यमान १२९ टक्के अधीक झाले. परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पावसाने वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांची दैना झाली. यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली. दिवाळीत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही,असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी यांनी शेतशिवारात बांधावर केलेल्या अनोख्या आंदोलनात केला. यावेळी भाकर, पिठलं, ठेचा शेतकऱ्यांसोबत खाऊन सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अफसाना सय्यद, युवक काँग्रेस चे अध्यक्ष नरेश बुरांडे, ईटोलीचे सरपंच तुळशीदास पिपरे, किन्ही येथील माजी सरपंच वासुदेव येरगुडे, जीवनकला आलाम, भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, प्राणेश अमराज, रवी देरकर, सुरेश वासाडे, शेखर आलाम, सुरेश बोप्पनवार, भास्कर कावळे, सुर्यकांत दयालवार, नाजुका आलाम, सुनील कोहरे, कैलास धानोरकर यांच्यासह शेतकऱ्यांची, कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या