गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे उद्घाटन, आज गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली इथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरूदास कामडी, उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक, म्हणून नागपूर येथील प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री.बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त), नागपूर, डॉ. संदीप तुंडुरवार होते. तसेच विशेष उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य संजय गोरे, ननंदाजी सातपुते, विवेक गोर्लावार, अध्यासन केंद्राचे समन्व्यक डॉ. सत्यनारायण सुदेवाड प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. संदीप तुंडुरवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य संजय गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सहा. प्रा. हेमराज निखाडे यांनी तर आभार डॉ. सत्यनारायण सुदेवाड यांनी मानले. कार्यक्रमला विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे जीवन, संस्कृती, भाषा व त्यांच्या समस्या या बाबतच्या संशोधनाला खूप वाव आहे. त्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा केंद्राची स्थापना महत्वाची आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात क्रांतिवीर बिरसा मुंडा संदर्भात संशोधन आणि त्यावर आधारित विकास यासंदर्भात संशोधन करणे, विकास तसेच विस्तार कार्य करणे हे ही केंद्राचे मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. याशिवाय भारतातील इतर आदिवासींचे जीवन आणि समस्यांवर हे केंद्र संशोधन कार्य करू शकेल. बिरसा मुंडा यांचे जीवन, संस्कृती यांचा अभ्यास, त्यांचे माहितीचे जतन करणे आवश्यक आहे. त्यातून निर्माण होणारी नवीन आव्हाने इत्यादी गोष्टींचा अभ्यास या केंद्रामार्फत केला जाईल. संशोधनाच्या सोबतच प्रबोधनाचेही कार्य या केंदामार्फत करण्यात येईल. हा या अध्यासन केंद्राचा उद्देश आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या