चंद्रपूर : मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन प्राधिकरणाच्या सचिवपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. यासंदर्भात गृहनिर्माण विभागाने आदेश जारी केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांद्वारे प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे विपीन पालिवाल हे मागील काही दिवसांपासून रजेवर होते. विपीन पालिवाल यांनी ३ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून मनपाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही त्यांच्याकडे प्रशासक म्हणून एकहाती सूत्रे होती. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे पूर्ण झाली तर काही कामे वादग्रस्त ठरली. सध्या नगर परिषद प्रशासनाच्या अधिकारी विद्या गायकवाड यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या