बल्लारपूर येथे बुधवारला महसूल अदालत, तसेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन तयार करण्याचे प्रशासनाचे आवाहन (Revenue court to be held in Ballarpur on Wednesday, administration appeals to prepare digital life certificate online)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर येथे बुधवारला महसूल अदालत, तसेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन तयार करण्याचे प्रशासनाचे आवाहन (Revenue court to be held in Ballarpur on Wednesday, administration appeals to prepare digital life certificate online)

बल्लारपूर :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सूचनेनुसार येत्या बुधवार १७ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे महसूल अदालत आयोजित करण्यात आली आहे. या महसूल अदालतमध्ये नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी व विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, नोंदवही, सातबारा उतारे, वारस नोंदी, जमीनसंबंधी तक्रारी आदी विषयांवरील अडचणींचे निराकरण होईल, अशी माहिती तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी दिली. बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांनी या महसूल अदालतमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या मांडून त्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहनही तहसिलदारांनी केले आहे.
          यासोबतच बल्लारपूर तालुक्यात राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाने लाभार्थ्यांचे हयात दाखले ऑनलाईन करण्यासाठी Beneficiary Satyapan App विकसित केले आहे. या अँपद्वारे लाभार्थ्यांचे Digital Life Certificate (DLC) ऑनलाईन तयार करणे आणि पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र १००% पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रसिद्धी माध्यम व प्रेसनोटव्दारे वारंवार सूचना दिल्या असून सुद्धा अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपले Digital Life Certificate ऑनलाईन काढलेले नसल्यामुळे ते अनुदान मिळण्यापासून वंचित राहू शकतात. ज्या लाभार्थ्यांनी Digital Life Certificate अद्याप तयार केले नाही त्यांनी तात्काळ आपल्या गावातील महसूल सेवक किंवा सेतू केंद्र येथे जाऊन प्रमाणपत्र तयार करून घ्यावे. DLC अपडेट न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान बंद राहण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी DLC त्वरित करुन घ्यावे असे आवाहन श्री.महेंद्र फुलझेले नायब तहसिलदार, बल्लारपूर यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)