बल्लारपूरातील गोल पुलिया परिसरात स्कॉर्पिओतून अवैध दारूची वाहतूक, ५.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटक (Illegal liquor traffic through Scorpio in Gol Puliya area of Ballarpur, goods worth Rs 5.16 lakh seized, accused arrested)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांना गुप्त माहितीच्या आधारे गोल पुलीया परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रं एम एच ३४ बी एफ ३५९५ ची तपासणी केली असता देशी व विदेशी दारूचा साठा मिळून आला. यात रॉकेट संत्रा, हायवर्ड ५ हजार, ऑफिसर चॉइस, इम्पेरियल ब्लु, बॅगपायपर यांसारख्या ब्रँडची दारू तसेच वाहन मिळून एकूण ५ लाख १६ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. बल्लारपूर पोलिसांनी गोलपुलीया येथे नाकाबंदी करून स्कॉर्पिओ वाहनातून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या अविनाश दिलीप सोनटक्के (३६) रा. विसापुर याला अटक केली असून ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई १२ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली. आरोपी अविनाश सोनटक्के हा परवाना नसताना दारूची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कलम ६५(अ), ९८ मद्यनिषेध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोअं नरेंद्र वाकडे, गुरू शिंदे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या