चंद्रपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन, १९ ते २१ सप्टेंबर नाट्य महोत्सवाची मेजवानी (For the first time, a national level tribal theatre festival is being organized in Chandrapur city, a festival of theatre will be held from 19th to 21st September)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन, १९ ते २१ सप्टेंबर नाट्य महोत्सवाची मेजवानी (For the first time, a national level tribal theatre festival is being organized in Chandrapur city, a festival of theatre will be held from 19th to 21st September)

चंद्रपूर :- बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त, चंद्रपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हा महोत्सव १९, २० आणि २१ सप्टेंबर २०२५ रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभेत सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, लोकजागृती नाट्य संस्था आणि दिवंगत माजी खा. बाळू धानोरकर मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे हा महोत्सव आयोजित केला आहे अशी माहिती अनिरुद्ध वनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाट्य महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे खासदार डॉ.नामदेव किरसान असतील. यावेळी व्यासपीठावर प्रा. वसंत पुरके, महाराष्ट्र अनुसूचित जमाती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री राम चव्हाण, प्रा. डॉ. इसादास भडके, डॉ. अनिल हिरेखान (रजिस्ट्रार, गोंडवाना विद्यापीठ), डॉ.दिलीप चौधरी (सिनेट सदस्य), अश्विनी खोब्रागडे, प्रमोद बोरीकर, प्राचार्य के.आत्माराम, ज्येष्ठ साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता, लोकजागृती नाट्य संस्था, चंद्रपूर प्रस्तुत आणि डॉ. अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित धरती आवा बिरसा मुंडा हा भव्य नाट्यप्रयोग होणार आहे. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता गोंडवनाचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमाके, हे नाटक रंगणार आहे. २१ सप्टेंबर रोजी सकाळी बॅरिस्टर राजा खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रजासत्तक चे प्रहारी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. लोकजागृती नाट्य संस्थेच्या गाजलेल्या घायल पाखरा या नाटकाचे ५७७ वे रंगमंच रात्री ८ वाजता होणार आहे. हे नाटक देशभरातील आदिवासी जीवनावर प्रकाश टाकते आणि दिल्ली आणि मुंबईपासून मणिपूर आणि आसामपर्यंत प्रसिद्ध झाले आहे. या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवाला सिनेकलाकार भारत रंगारी, रवींद्र धकाते, संजीव रामटेके, प्रा. डॉ. शेखर डोंगरे, पंचम झाडीपती नाट्य संमेलनाध्यक्ष के. आत्माराम, शुभांगी राऊत, रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे, रासेकर, प्रविण भासरकर, प्रमोद दुर्गे, अखिल असारकर, निखिल मानकर, तिराणिक, प्रा. राजकुमार मुस्ने, शेषराव सहित दीडशे कलाकार भाग घेत आहे. हा नाट्य महोत्सव सर्व रसिकांसाठी मोफत आहे आणि आयोजक आणि महोत्सव संचालक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रेक्षकांना वेळेवर उपस्थित राहून आदिवासी नाट्य संस्कृतीचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)