बल्लारपूर :- दि.०१/०८/२०२५ रोजी शहर कांग्रेस कमेटी तर्फे बल्लारपूर शहरात स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, ते तात्काळ थांबवण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर यांना देण्यात आला. निवदेनात म्हटले आहे की, बल्लारपुर शहरात मागील काही दिवसांपासून जूने विज मिटर काढून नवीन स्मार्ट मिटर लावन्याचे काम आपल्या विभागातर्फे सुरु करण्यात आलेले आहे. परंतू ज्यांच्या घरी हे स्मार्ट मिटर लावन्यात आलेले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार स्मार्ट मिटर लावल्या नंतर त्यांचे विज बिल दुप्पट झालेली आहे. काही तक्रारीनुसार मिटर लावणारी एजेंसी कडुन विज ग्राहकांवर दडपण आणून स्मार्ट मिटर लावन्यात येत आहे.करीता आपनांस नम्र विनंती आहे की बल्लारपुर शहरात स्मार्ट विज मिटर लावण्याचे काम तत्काल थांबावे. तसेच ज्यां विज ग्राहकांच्या घरी , दुकानात नवीन स्मार्ट मीटर लावन्यात आलेले आहे त्याना काडुन जूने विज मीटर लावन्यात यावे.ही विनंती. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, शहराध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, भास्कर माकोडे, डॉ. सुनील कुलदीवार, नरेश मूंधड़ा, सुनंदा आत्राम, नरसिंग रेब्बावार, प्रणेश अमराज, मेहमूद पठाण, कासिम शेख, मंगेश बावणे, नरेश आनंद, नरेश बुरांडे यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूएआय आणि इंटकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या