बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत क्षेत्रामध्ये शहरात विविध ठिकाणी तसेच मुख्यरस्त्यावर अनेक मांस/मटण/मच्छी विक्रेते अनाधिकृतपणे आपला मांस विक्रीचा व्यवसाय करीत आहे. सदर अनाधिकृत पणे व्यवसाय करणा-या मांस मटण व मच्छी विक्रेते यांचे विरूध्द नगर परिषद कार्यालयास वारंवार अस्वच्छते बाबत तक्रार प्राप्त होत आहे. त्यानुसार स्वच्छता निरीक्षक यांनी सदर विक्रेत्यांचे ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली असता सदर व्यवसायाचे ठिकाणी अत्यंत अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच सदर विक्रेते आपल्या दुकानामधील टाकाउ मास सार्वजनिक रस्त्याचे बाजुला उघड्यावर टाकत आहे. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्रे आक्रमक होउन नागरीकांवर हल्ला करीत आहे. तसेच शहरमधील काही ठिकाणी धार्मिक स्थळापासुन 100 मीटरच्या आत मास/मटण/मच्छी विक्री करीत असल्याचे दिसुन येत आहे.
त्याचप्रमाणे सदर विक्रत्यांकडे नगर परिषदेचा परवाना नसल्याचे निर्दशनास येत आहे. बल्लारपूर शहरामध्ये सर्व मांस मटण मच्छ विक्री करीत असलेल्या सर्व विक्रेत्यांवर नगर परिषदेने वार्षीक शुल्क 1000/- रूपये आकारणी करणे, सदर मांस/मटण/मच्छो विक्री करीत असलेल्या जागचे दुकान गाळयाचे मालकी हक्क असलेले दस्तऐवज / वार्षीक भाडे करारनामा दस्तऐवज त्याचप्रमाणे 100 रूपयाचे स्टॅप पेपरवर धार्मीक स्थळांपासुन 100 मिटर परिसरामध्ये मांस विक्रीचा व्यवसाय न करणे बाबतचे सःयंघोषणापत्र, व्यवसायाचे परिसरामध्ये स्वच्छता राखने, दुकानामधील टाकावू मांस उघडयावर न टाकता नगर परिषदेच्या घंटागाडी मध्ये टाकणे, या अटी व शर्तीनुसार शहरामधिल सर्व विक्रेते यांनी 14 ऑगष्ट 2025 पूर्वी मांस विक्रीचा व्यवसाय परवाना प्राप्त करण्यात यावा. सर्व मांस मटण व मच्छी विक्रेते यांनी नगर परिषदेचा व्यवसाय परवाना प्राप्त करून मांस मटण विक्रीचा व्यवसाय करण्यात यावा. अन्यथा अनाधिकृत पणे व्यवसाय करणारे मांस/मटण/मच्छी विक्रेते यांचेवर नगर परिषदेमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याबाबत गंभिरतेने नोंद घ्यावी असे आवाहन श्री विशाल वाघ प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या